ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ITR इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. आयटीआर फाइलिंग करणे हे अनेकरित्या फायदेशीर ठरु शकते.
आयकर कायद्यांतर्गत आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे. वेळेवर आयटीआर फाइल करुन दंड टाळता येतो. जर तुम्ही जास्त कर भरला असेल तर तुम्ही आयटीआर दाखल करुन परतावा म्हणजेच रिफंड मिळवू शकता.
बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी गेल्या 3-5 वर्षांचा आयटीआर मागतात. हा तुमच्या उत्पन्नाचा पुरावा आहे, ज्यामुळे कर्ज मिळवणे सोपे होते.
नियमितपणे आयटीआर दाखल केल्याने तुमचे आर्थिक प्रोफाइल मजबूत होते. त्यामुळे व्यवसाय, नोकरी किंवा गुंतवणुकीसाठी विश्वासार्हता वाढते.
अनेक परदेश प्रवासासाठी व्हिसा अर्ज करताना आयटीआरची प्रत मागतात. यामुळे तुमच्या उत्पन्नाचा आणि आर्थिक स्थिरतेचा पुरावा मिळतो
जर तुमच्या व्यवसायात किंवा गुंतवणुकीत नुकसान झाले असेल, तर आयटीआर दाखल करून ते पुढील 8 वर्षांसाठी जमा होते.
वेळेवर आयटीआर दाखल केल्याने आयकर विभागाकडून नोटीस किंवा चौकशीचा धोका कमी होतो. हे तुमची आर्थिक पारदर्शकता दर्शवते.
उशिरा आयटीआर दाखल केल्यास किंवा न भरल्यास 1% मासिक व्याज आणि 5,000 ते 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.