ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला सुंदर आणि निरोगी त्वचा हवी असते.
मात्र निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी काळजी घेणं महत्त्वाचे असते.
फेस मसाज केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.
फेस मसाज दररोज केल्यास चेहऱ्यावर रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्वचा चमकते.
फेस मसाज करताना मसाज क्रिम किंवा फेस ऑईलचा वापर करावा.
फेस मसाज केल्यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते आणि पिंप्लसची समस्या दूर होते.
फेस मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.