ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे तुमचं वजन झपाट्याने वाढू लागतं.
मात्र वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत आहाराकडे सुद्धा विशेष लक्ष देणं गरजेचे असते.
अनेकजण आपल्या आहोरामध्ये पनीर ऐवजी टोफू खाण्यास पसंती देतात.
टोफूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं ज्याचे सेवन केल्यास शरीराला फायदे होतात.
टोफू खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होते त्यासोबतच वजन देखील कमी होतं.
टोफूमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळतं ज्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू बळकट होतात.
टोफू खाल्ल्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होत नाही आणि तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहातं.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.