Ruchika Jadhav
भेंडीची भाजी काही व्यक्तींना फार आवडते. तुम्ही सुद्धा भेंडीची भाजी खात असाल. पण तुम्हाला माहितीये का? भेंडीचे पाणी सुद्धा आरोग्यासाठी गुणकारी आहे.
भेंडीचे पाणी बनवणे फार सोपे असून भेंडी विविध आकारात कापा आणि पाण्यात टाकून ठेवा.
भेंडीचं पाणी प्यायल्याने त्या व्यक्तीच्या त्वचेवर एक वेगळीच चमक आणि ग्लो येतो.
ज्या व्यक्तीच्या रक्तातील साखर अचानक जास्त वाढते त्यांना भेंडीचं पाणी पिण्यासाठी द्यावे.
भेंडीमध्ये अँटीऑक्सीडेंट असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं.
भेंडीचं पाणी प्यायल्याने व्यक्तीचं वजन कमी होतं.
भेंडीमध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आहेत. यात व्हिटॅमीन आणि फायबर सुद्धा आहे.