Ruchika Jadhav
पूर्वीच्याकाळी सर्वव्यक्ती मातीच्या भांड्यामध्येच जेवण बनवायचे. त्यामध्ये जेवण अधिक रुचकर लागत होते.
मातीच्या भांड्यात शिजवलेलं जेवण प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी पौष्टीक असतं.
अनेक व्यक्तींना जेवणात गॅसच्या समस्या असतात. मातीच्या भांड्यात जेवण बनवल्याने त्या समस्या दूर होतात. तसेच वाताच्या समस्या देखील दूर होतात.
कॅल्शियम, सल्फर, सिलीकॉन, कोबाल्ड अशी अनेक पोषक तत्वे मातीच्या भांड्यात असतात.
मातीची भांडी जेवण बनवण्यासाठी वापरण्याआधी काही काळजी घेणं गरजेचं आहे.
मातीच्या भांड्यात जेवण बनवताना आधी ते २ तास पाण्यात भीजत ठेवावे.
त्यानंतर त्याला पिठ किंवा वाटलेले तांदूळ लावून धुवून घ्यावे. असे न केल्यास मातीच्या भांड्याचा आरोग्यावर उलट परिणाम होतो.
गावी मातीच्या भांड्यात फक्त जेवण नाही तर चहा, पाणी आणि सरबत असे पेय देखील बनवले जातात.