ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आहारात चिया सिड्सचा समावेश केल्यास आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
चिया सिड्समध्ये विविध पोषक तत्त्व आढळतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला पोषण मिळते.
चिया सिड्समध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, आणि मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म आढळतात.
चिया सिड्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
चिया सिड्समध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतं ज्यामुळे वजन कमी करण्यास आणि नियंत्रित राहाण्यास मदत होते.
चिया सिड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात ज्यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
चिया सिड्स खाल्यामुळे मानसिक आरोग्य निरोगी राहाते आणि त्यासोबतच हृदयाचे आरोग्य सुधारते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.