ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच अनेकांना संसर्गाचे आजार होतात.
संसर्गाच्या आजारांमुळे तुम्हाला ताप, सर्दी, खोकला सारख्या समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात संसर्ग होऊ नये म्हणून घरातील तुळस फायदेशीर ठरते.
तुळशीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आढळतात ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
तुळशीचे पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला स्वसनासंबंधीत समस्या होत नाहीत.
तुळशीचे पाणी प्यायल्यामुळे पावसाळ्यात पोटासंबंधीत आजार होत नाही.
तुळशीचे पाणी मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर ठरते त्यामुळे शरीरातील साखर नियंत्रित रहाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.