Saam Tv
लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
खोटी माहिती भरुन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा होती.
महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.
जर तुम्ही अपात्र असाल तरीही योजनेचे १५०० रुपये घेतले तर तुम्हाला पैसे परत करावे लागतील. अशी माहिती आली होती.
मात्र ही बाब खोटी असून मार्चमध्ये लाडक्या बहिणींचा १५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.
हा हप्ता दिला जाणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलआहे.