Shreya Maskar
वयाची चाळीशी ओलांडल्यावरही तुम्ही फिट राहू शकता, फक्त लाइफस्टाइमध्ये थोडे बदल करावे लागतील.
दररोज किमान १०-१५ मिनिटे चाला. चालल्याने कॅलरीज जळतात, वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे सांध्यांवर ताण येत नाही, जे या वयात खूप महत्त्वाचे आहे.
कॅलरीज जाळते आणि हळूहळू पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. ऊर्जेची पातळी वाढवते.
बाहेर सायकल चालवणे असो किंवा घरातील 'स्टेशनरी' सायकलवर व्यायाम करणे सायकलिंग अत्यंत फायदेशीर आहे. यात सांध्यांवर कमी ताण येतो, ज्यामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण पडत नाही.
सायकलिंग चरबी जाळण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात, सहनशक्ती सुधारते.
पोहताना शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो. स्नायू बळकट होतात, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि सहनशक्ती सुधारते. हे सर्व सांध्यांवर कोणताही ताण न देता करता येते.
पोहताना कॅलरीज जळतात, लवचिकता वाढते आणि स्टॅमिना तयार होतो. सहनशक्ती सुधारते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.