ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपला झोपण्यापूर्वी की झोपेतून उठल्यानंतर कधी अभ्यास केल्याने मेंदूची स्मरणशक्ती वाढते, जाणून घ्या.
झोपेच्या वेळी मेंदू सगळी माहिती एकत्रित करतो. तसेच दीर्घकालीन स्मरणशक्ती मजबूत करतो. म्हणून कठीण विषयांचा अभ्यास झोपण्यापूर्वी करावा.
रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यास मानसिक थकवा जाणवतो. यामुळे सकाळी उठल्यानंतर गोष्टी आठवण्यास अडचण येऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर मेंदू ताजा आणि सतर्क असतो. यामुळे लक्ष केंद्रित करणे, क्रिएटिव्ह गोष्टी करणे आणि समस्या सोडवण्यासाठी हा वेळ सर्वोत्तम मानला जातो.
सकाळी पूर्णपणे जागे होण्यास वेळ लागतो. त्यातच जर तुमची झोपेची वेळ आणि गुणवत्ता खराब असेल यावेळी अभ्यास करणे फायदेशीर ठरणार नाही.
झोपण्यापूर्वी अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढू शकते.
सकाळी अभ्यास केल्याने एकाग्रता आणि आकलनशक्ती वाढू शकते. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या आणि सर्वोत्तम वेळेत अभ्यास करु शकता.