Heart Attack Warning: हार्ट अटॅक येण्यापूर्वी पायांमध्ये या २ ठिकाणी होऊ लागतात वेदना

Surabhi Jayashree Jagdish

धमन्यांमध्ये अडथळा

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि प्लाक साचल्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. हा प्लाक फुटून रक्ताची गुठळी तयार झाल्यास धमनी पूर्णपणे बंद होऊ शकते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.

Heart Attack Symptoms | saam tv

उच्च रक्तदाब, मधुमेह आणि धूम्रपान

दीर्घकाळ उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जास्त ताणतणाव आणि अयोग्य आहारही धमन्यांसाठी धोकादायक असतो. हे सर्व घटक एकत्र आल्यास हार्ट अटॅकची शक्यता अधिक वाढते.

Disease | saam tv

हार्ट अटॅकची लक्षणं

छातीत दाब, जडपणा किंवा तीव्र वेदना होणं हे हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण आहे. ही वेदना डावा हात, खांदा, मान, जबडा किंवा पाठीत पसरू शकते तसंच घाम येणे, मळमळ, श्वास घेण्यास त्रास आणि अचानक अशक्तपणा जाणवू शकतो.

Peripheral Artery Disease | saam tv

हार्ट अटॅकपूर्वी पोटरीत वेदना

काही लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी पोटरीत वेदना, गोळा येणं किंवा चालताना वेदना जाणवू शकते. हे प्रामुख्याने पायातील धमन्यांमध्ये रक्तपुरवठा कमी होण्याचं लक्षण असू शकतं. असं झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Coronary Artery Disease | saam tv

मांडी किंवा नितंबाकडे वेदना

काही व्यक्तींमध्ये मांडी किंवा नितंबाच्या भागात चालताना वेदना किंवा जडपणा जाणवू शकतो. हे देखील शरीरातील धमन्यांमध्ये अडथळा असल्याचे संकेत असू शकतात. अशी लक्षणं सतत जाणवत असल्यास हृदयाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

Blocked Arteries | saam tv

निरोगी जीवनशैली

संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि शरीराचं वजन नियंत्रणात ठेवा. धूम्रपान आणि तंबाखूच सेवन पूर्णपणे टाळा आणि मद्यपानावर नियंत्रण ठेवा. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी राहण्यास मदत होते.

Blood Circulation | saam tv

डिस्क्लेमर

हे माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. हार्ट अटॅकची लक्षणं किंवा इतर कोणतीही गंभीर आरोग्य समस्या जाणवल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा जवळच्या रुग्णालयात संपर्क साधा.

Health | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Heart disease | saam tv
येथे क्लिक करा