Shreya Maskar
आपल्याला ऑफिसमध्ये काम करताना खूप भूक लागते. अशा वेळी जंक फूड खाण्या ऐवजी हेल्दी बीटरूट चिप्स खा. यामुळे तुमचे पोट भरेल आणि तुम्ही पौष्टिक खाल.
बीटरूट चिप्स बनवण्यासाठी बीट, काळी मिरी , मीठ, तेल, रोजमेरी इत्यादी साहित्य लागते
बीटरूट चिप्स बनवण्यासाठी ताजे छोटे बीट स्वच्छ करून सोलून घ्या. बीट ताजे-कोवळे असू द्या. जेणेकरून ते कुरकुरीत होतील.
त्यानंतर बीटाचे पातळ काप करून पाण्यात भिजत ठेवा. थोड्या वेळाने चिप्स पंख्याखाली थोडे कोरडे करा.
एका बाऊलमध्ये बीटाचे काप, काळी मिरी, मीठ, तेल आणि रोजमेरी टाकून सर्व मिक्स करा. तयार मिश्रण 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
बेकिंग ट्रे ला तूप किंवा तेल लावून बीटरूट चिप्स त्यावर पसरवा आणि चांगले कुरकुरीत करा.
ओव्हन साधारण 150 डिग्रीवर प्री हिट करा. त्यानंतर ओव्हनमध्ये 10-15 मिनिटे चिप्स भाजा. मस्त 15 मिनिटांत तुम्हाला कुरकुरीत बीटरूट चिप्स तयार होतील.
तयार बीटरूट चिप्स हवा बंद डब्यात ठेवा. जेणेकरून ते चांगले महिनाभर लागतील. त्याला हवा लागणार नाही, याची काळजी घ्या.