Manasvi Choudhary
संपूर्ण दिवस कामाच्या धावपळीतून घरी आल्यानंतर प्रत्येकाला शांतता हवी असते. घरामध्ये बेडरूम ही अशी जागा आहे जेथे प्रत्येकालाच प्रसन्न आणि आरामदायी वाटते.
तुम्हालाही जर तुमच्या बेडरूमचा लूक बदलायचा असेल, रोमॅन्टिक टच द्यायचा असेल, तर ५ भन्नाट बेडरूम डेकोरेशन आयडिया तुमच्यासाठी या वेबस्टोरीतून घेऊन आलो आहेत.
बेडरूममध्ये प्रकाशासाठी लाईट्सऐवजी वॉर्म व्हाईट किंवा डिम लाईट्स लावा. बेडच्या मागे किंवा पडद्यांवर पिवळ्या रंगाच्या फेअरी लाईट्स तुम्ही लावू शकता.
बेडशीटसाठी पेस्टल शेड्स असलेले क्रीमी व्हाईट रंगांचे पडदे, बेडशीट निवडा. यासोबतच सिल्क किंवा नेटचे शीअर पडदे लावा.
बेडरूममधील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी छान सुंगध महत्वाचा आहे. बेडच्या बाजूला किंवा टेबलवर अरोमा मेणबत्त्या किंवा रोझ, लॅव्हेंडर, जॅस्मिन फ्लेवरचे मेणबत्ती निवडा.
बेडच्या समोरच्या किंवा बाजूच्या भिंतीवर तुमच्या सुंदर आठवणी दर्शवणारे फोटो फ्रेम लावा. याशिवाय रोमॅन्टिक कोट्स किंवा निसर्गरम्य वॉल आर्ट्सचा देखील लावू शकता.
बेडवर कॉटन किंवा सॅटिन- सिल्कच्या मऊ बेडशीट वापरा तसेच सॉफ्ट पिलो ठेवा.