Ruchika Jadhav
सुंदर आणि आकर्षक चेहरा दिसावा यासाठी प्रत्येक महिला आयब्रो करत असतात.
मात्र वारंवार आयब्रो केल्याने त्याचे डोळ्यांवर आणि त्वचेवर काही दुष्परिणाम होतात हे तुम्हाला माहिती आहे का?
अनेक महिलांना आयब्रो केल्यानंतर चेहऱ्यावर बारीक पुरळ येण्यास सुरूवात होते.
तर काही व्यक्तींना त्वचेतून रक्त देखील येते आणि त्वचा कोरडी पडते.
या गोष्टी टाळण्यासाठी आयब्रो केल्यानंतर चेहऱ्यावर रात्री झोपण्याआधी दूधाच्या सायने मसाज करावे.
जाड आयब्रो असल्यास थ्रेडिंग केल्यानंतर स्किन फार झोंबते. अशावेळी तुम्ही बर्फाने डोळे शेकवू शकता.
तसेच जास्त त्रास जाणवत असल्यास तुम्ही काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावेत. त्याने होणारा त्रास कमी होतो.
आयब्रोचे केस थ्रेडिंग करताना जर त्यामुळे डोळ्यावर डाग पडला असेल तर चंदनाचा लेप लावा.
टीप : सदर माहितीही फक्त माहिती म्हणून वाचनासाठी आहे. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.