Shruti Vilas Kadam
चेहऱ्यावर धूळ, तेल किंवा घाण असताना मेकअप केल्यास त्वचेवरील छिद्रे बंद होऊ शकतात आणि पिंपल्सची समस्या वाढू शकते.
त्वचा कोरडी असल्यास मेकअप पॅची दिसू शकतो. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर लावून त्यानंतर मेकअप करणे चांगले.
दिवसा मेकअप करताना सनस्क्रीन न लावल्यास सूर्याच्या UV किरणांमुळे त्वचेवर टॅनिंग आणि पिग्मेंटेशन होऊ शकते.
एक्सपायर्ड मेकअप वापरल्याने त्वचेवर खाज, लालसरपणा, पुरळ किंवा इतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनाची एक्सपायरी डेट तपासा.
नियमित साफसफाई न केलेल्या ब्रश आणि स्पंजवर बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. त्यामुळे ते वापरल्यास त्वचेवर पिंपल्स किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
दिवसभराचा मेकअप चेहऱ्यावर ठेवून झोपल्यास त्वचेवर तेल, घाण आणि मेकअपचे अवशेष जमा होऊ शकतात. झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढा.
तेलकट, कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असल्यास त्यानुसार उत्पादने निवडणे महत्त्वाचे आहे. नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणेही योग्य ठरते.