Manasvi Choudhary
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. मात्र तुम्हाला माहितीये का? तुम्ही नियमित करत असलेल्या चुकांमुळे त्वचेवर परिणाम होतो.
कोणत्या चुका केल्याने त्वा खराब होते? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
मऊ, मुलायम, ग्लोईंग त्वचेसाठी केवळ चेहऱ्याची काळजी नाही तर तुम्ही सवयींमध्ये बदल केला पाहिजे.
सकाळी चहासोबत टोस्ट खाण्याची सवय अनेकांना असते. पण टोस्टमध्ये असलेली साखर आणि 'ट्रान्स फॅट'मुळे त्वचेवर सूज येऊ शकते आणि नैसर्गिक चमक कमी होते.
धूम्रपान केल्याने त्वचेवर परिणाम होतो. धूम्रपानामुळे फ्री रॅडिकल्सद्वारे त्वचेचे नुकसान वेगाने होते.
अनेक सेलिब्रिटी त्वचा सुधारण्यासाठी भरपूर पाणी पितात. पाणी पिणे त्वचेसाठी फायदेशीर असले तरी त्याचे प्रमाण योग्य असावे. शरीरात पुरेसे पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होतो.
अनेकांना फोन स्क्रोलिंग करण्याची सवय असते विशेषत:रात्रीच्या वेळी बंद लाईटमध्ये फोन स्क्रोल केल्याने त्वचेचे नुकसान होते यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.