Manasvi Choudhary
सध्या इन्व्हिजिबल दागिने घालण्याचा नवीन ट्रेंड सुरू आहे. महिला खास पारंपारिक लूकवर हे दागिने परिधान करतात.
इन्व्हिजिबल दागिन्यांमध्ये गळ्यात घालण्यासाठी नाजूक नेकलेसच्या अनेक डिझाईन्स आहेत.
पण आज आम्ही तुम्हाला हटके आणि युनिक Invisible मंगळसूत्राविषयी सांगणार आहोत.
इन्व्हिजिबल मंगळसूत्र हे तुम्ही साडी आणि ड्रेसवर घालू शकता. मराठमोळ्या लूकसाठी Invisible मंगळसूत्र सध्या ट्रेडिंग आहेत.
इन्व्हिजिबल मंगळसूत्र हे पारदर्शक म्हणजेच बारीक धाग्यावर मणी आणि पेडंट लावून बनवतात.
हे मंगळसूत्र घातल्यानंतर फक्त काळे मणी आणि पेडंट दिसते यामुळे याला Invisible मंगळसूत्र असे म्हणतात.
हे मंगळसूत्र वजनाला अत्यंत हलके असते यामुळे ते रोजच्या वापरासाठी बेस्ट आहे.
इन्व्हिजिबल मंगळसूत्रामध्ये अनेक नवनवीन प्रकार आहेत. कमळ पेडंट, फ्लोरल पेडंट, मोती पेडंट हे खास डिझाईन करून घेऊ शकता.