Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूच्या मांडणीविषयी आणि जागेविषयी सांगितले आहे. बाथरूममधील नळ बसवतानाही वास्तुशास्त्रातील काही नियम सांगितले आहेत.
बाथरूममध्ये नळाची फिटींग करताना कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील शॉवर, वॉशबेसिनचे नळ किंवा पाण्याचा मुख्य पाईप नेहमी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावा.
बाथरूमच्या दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर पाण्याचा नळ बसवणे अशुभ मानले जाते. या दिशेला पाण्याचा निचरा किंवा नळ असल्यास घरात सतत आर्थिक चणचण आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
बाथरूममधील नळ सतत गळत असेल तर तो वास्तुदोष मानला जातो.
आजकालच्या मॉड्यूलर बाथरुममध्ये टॉयलेट आणि शॉवर किंवा वॉशबेसिन एकत्र असतात. अशा वेळी टॉयलेट सीटच्या अगदी जवळ नळ असणे चुकीचे मानले जाते.
बाथरूममधील पाण्याचा निचरा होण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे नळ असावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.