Siddhi Hande
जेवताना तोंडाची चव वाढवण्यासाठी तुम्ही तोंडी लावण्यासाठी पापड, लोणचं असं काहीतरी खाता.
तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी आता बटाट्याचे कुरकुरीत काप बनवू शकतात.
बटाट्याचे काप बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे छान धुवून स्वच्छ पुसून घ्या.
बटाट्याचे एकदम बारीक गोलाकार काप करा. हे काप जेवढे बारीक तेवढं ते कुरकुरीत होतील.
सर्वात आधी तुम्ही अदरक, लसूण आणि मिरचीची बारीक पेस्ट करा.
यानंतर तुम्हाला एका भांड्यात बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यासोबत तुम्ही बेसन आणि तांदळाचं पीठदेखील घेऊ शकता. त्यावर मसाला, मिरची पावडर आणि मीठ टाकायचं आहे.
यानंतर प्रत्येक बटाट्याच्या कापाला मिरचीची पेस्ट लावा. त्यानंतर ते रव्यात मिक्स करा.
तव्यावर तेल टाकून घ्या. तेल छान तापल्यावर एकेक काप ठेवा.
हे काप दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
बटाट्याचे काप खूप चविष्ट असतात. यामुळे जेवणाला वेगळीच टेस्ट येईल.