Batata Vada Recipe : ना बेसन ना चणाडाळ; तरीही बनेल कुरकुरीत बटाटा वडा, रेसिपी आहे खूपच सोपी

Shreya Maskar

बटाटा वडा

बटाटा वडा बनवण्यासाठी भिजवलेली मूग डाळ, हिंग, हळद, मीठ, तांदळाचे पीठ, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, जिरे, मोहरी, हिंग, मीठ, कोथिंबीर, तेल, पाणी आणि कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.

Batata Vada | pinterest

मूग डाळ

बटाटा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग डाळ धुवून रात्रभर भिजवून घ्या. भिजवल्यानेही ती चांगली फुगण्यास मदत होईल. नंतर बटाटे धुवून उकडून घ्या. ते थंड झाल्यावर त्यांची साल काढा.

Moong Dal | pinterest

आलं - लसूण

मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं. त्यात अर्धा चमचा जिरे घालून सर्व मिश्रण वाटून घ्या. वाटताना पाणी वापरू नका याची काळजी घ्या.

Ginger-Garlic | pinterest

मीठ

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, आले-मिरची-जिऱ्याची पेस्ट घालून एक मिनिट परता. हळद, मीठ आणि धणेपूड घालून ढवळा, आणि नंतर बटाटे मॅश करून मिश्रणात घाला.

Salt | pinterest

तांदळाचे पीठ

दुसरीकडे भिजवलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यात वाटा. वाटताना अगदी थोडे पाणी वापरा. मूग डाळ वाटल्यानंतर, त्यात मीठ, हळद आणि दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ घाला.

Rice Flour | pinterest

तेल

बटाट्याच्या सारणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करा. बटाट्याचे गोळे डाळीच्या पेस्टमध्ये बुडवून गरम तेलात सोडा.

Oil | pinterest

वडा-चटणी

बटाटे वडे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत आणि लाल सुख्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Vada & Chutney | pinterest

ट्रिक

जर तुम्हाला तेल न वापरता वडा बनवायचा असेल, तर आप्पम पॅनमध्ये गोळे डाळीच्या पिठात बुडवा आणि वरून हलके तेल लावा. फक्त झाकण ठेवून अधूनमधून हलवत शिजवा. चविष्ट मूग डाळीचा वडा तयार आहे.

Tip | pinterest

NEXT : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

Beetroot Rice Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...