Shreya Maskar
सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी झटपट स्पेशल बटाट्याची भाजी बनवा.
बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटा, टोमॅटो , आलं, हिरवी मिरची, हिंग, जिरे, धणे पावडर, बडीशेप, हळद, लाल तिखट, मीठ, तेल, आमचूर पावडर आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटा शिजवून त्याची साल काढून घ्या.
मिक्सरमधून टोमॅटो, आलं, हिरवी मिरची एकत्र वाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग आणि जिरे घालून फोडणी तयार करा.
यात तयार वाटण, धणे पावडर, बडीशेप, हळद, लाल तिखट घालून व्यवस्थित एकजीव करा.
शेवटी यात उकडलेले बटाटे कुस्करून टाका.
गरमागरम चपातीसोबत बटाट्याच्या भाजीचा आस्वाद घ्या.