Shruti Vilas Kadam
बँक्सिंगमध्ये एक जोडीदार हळूहळू भावनिकदृष्ट्या दूर जातो. तो थेट ब्रेकअप करत नाही, पण संवाद कमी करतो, वेळ देणं थांबवतो आणि नातं ‘हळूहळू मरू’ देतो.
यात "आपण संपवूया" असं कुठेही स्पष्ट बोललं जात नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला समजतही नाही की नातं संपलं आहे का?
बँक्सिंग या ट्रेंडचं नाव प्रसिद्ध स्ट्रीट आर्टिस्ट Banksy याच्यावरून पडलं आहे. त्याच्या एका पेंटिंगनं स्वतःची नासधूस केली होती अगदी या ब्रेकअपसारखंच!
Ghosting म्हणजे अचानक गायब होणं. पण बँक्सिंगमध्ये व्यक्ती काहीशा तुटक पद्धतीनं सतत संपर्कात राहते, त्यामुळे समोरच्याला आशा राहते, पण नातं संपत जातं – हे अधिक वेदनादायक असतं.
समोरच्याला नेमकं काय होतंय हे समजत नाही. तो/ती स्वतःला दोष देतो/देते, आत्मविश्वास हरवतो आणि चिंता वाढते.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, बँक्सिंग ही एक प्रकारची टॉक्सिक पद्धत आहे. यात स्वतः ब्रेकअपची जबाबदारी टाळली जाते आणि समोरच्याला मानसिक क्लेष दिला जातो.
सोशल मीडियावर आधारित नाती, थेट संवाद टाळण्याची सवय, आणि भावनिक अपरिपक्वता यामुळे बँक्सिंगसारखे ट्रेंड तरुण पिढीत वाढताना दिसतात.