Shreya Maskar
उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीत कोकण ट्रिप करा. रत्नागिरी येथे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण लपलेले आहे. जेथे तुम्ही आवर्जून जा.
बाणकोट किल्ला ज्याला 'हिम्मतगड' किंवा 'फोर्ट व्हिक्टोरिया' म्हणूनही ओळखले जाते, हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वेलास आणि हरिहरेश्वर जवळ वसलेला आहे.
बाणकोट किल्ला लाल दगडांनी बांधलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. या किल्ल्यावरून सावित्री नदीच्या मुखाचे आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
बाणकोट किल्ला मोक्याच्या ठिकाणी वसलेला आणि चौकोनी आकाराचा सागरी किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. जिथून सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते, येथे संगमाचे विहंगम दृश्य पाहता येते.
बाणकोट किल्ला पोर्तुगीज काळापासून ते मराठा राजवटीपर्यंतच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो. येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवता येईल.
बाणकोट किल्ल्यावरून कोकणातील निसर्गरम्य आणि अस्सल ग्रामीण दृश्यांचा आनंद घेता येतो. तसेच तुम्ही सूर्यास्ताचा सुंदर नजारा देखील पाहू शकता.
बाणकोट किल्ल्यावरील प्रमुख आकर्षणामध्ये नूतनीकरण केलेले बुरुज, ब्रिटिशकालीन तोफ, निसर्गरम्य गणेश मंदिर आणि किल्ल्याच्या मध्यभागी असलेला एक खोल पाण्याचा तलाव यांचा समावेश होतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.