Shreya Maskar
वांद्रे किल्ला, ज्याला कॅस्टेला दे अगुआडा (Castella de Aguada) असेही म्हणतात. मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात बँड स्टँड जवळ समुद्रकिनारी स्थित आहे.
वांद्रे किल्ला पोर्तुगीजांनी १६४० मध्ये अरबी समुद्र आणि माहीमच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी (टेहळणी बुरूज म्हणून) बांधला होता.
वीकेंडला वन डे पिकनिक स्पॉटसाठी वांद्रे किल्ला उत्तम ठिकाण आहे. या किल्ल्यावरून वांद्रे-वरळी सी-लिंकचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.
वांद्रे किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. वांद्रे किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. पावसाळ्यात येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वांद्रे किल्ल्यावर अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. यात दिल चाहता है, जाने तू... या जाने ना, वॉन्टेड , तलाश , आशिकी २ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
मुंबईतील वांद्रे स्टेशनला उतरून पुढे तुम्ही रिक्षा किंवा बसने वांद्रे किल्ल्यापर्यंत जाऊ शकता. किल्ल्याच्या बाजूला एक सुंदर बाग देखील आहे. जेथे तुम्ही संध्याकाळी निवांत वेळ घालवू शकता.
एलिफंटा लेणी, कान्हेरी लेणी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, वसईचा किल्ला, गेटवे ऑफ इंडिया अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.