Shreya Maskar
आजकाल साड्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. उदा. बनारसी, पैठणी, कांजीवरम, बांधणी , पट्टोला , काठा पदराची साडी, जॉर्जेट साडी, चंदेरी साडी
बांधणी साडी हा एक अत्यंत सुंदर आणि पारंपारिक भारतीय साडीचा प्रकार आहे.महिलांना या साड्या प्रचंड आवडता. सर्वत्र आजही बांधणीच्या साडीची क्रेझ पाहायला मिळते.
बांधणी साड्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स, रंग, पॅटर्न पाहायला मिळतात. लग्नात, सणासमारंभासाठी या साड्या परफेक्ट आहेत.
बांधणी साड्या गुजरात, राजस्थानमध्ये लोकप्रिय आहेत. तुम्हाल ऑनलाइन तसेच मुंबईच्या शॉपिंग मार्केटमध्ये यांची असंख्य व्हरायटी पाहायला मिळेल.
रेशीम, सिल्क ,शिफॉन जॉर्जेट, कॉटन अशा विविध फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही साडी आणि ब्लाउज खरेदी करताना फॅब्रिकची निवड योग्य करा.
बोट नेक , हाय नेक , स्वीटहार्ट, स्क्वेअर नेक हे बांधणी साडीसोबत चांगले दिसतात. फेस्टिव्ह लूक हवा असेल तर झरी वर्क, एम्ब्रॉयडरी, स्टोन, मोती लावलेल्या ब्लाउज निवडा.
बांधणी साडीला मॉडर्न टच देण्यासाठी जॅकेट ब्लाउज परिधान करा. तसेच तुम्हाला कॉन्ट्रास्ट रंगसंगती पाहिजे असेल तर स्लीव्हलेस ब्लाउज उत्तम राहील.
बांधणी साडीवर मल्टी कलर, लाल रंग, काळा रंग, गोल्डन रंग, चंदेरी रंग यांचे ब्लाउज चांगले वाटतील. तसेच साडीच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा ब्लाउज निवडा. कॉन्ट्रास्ट करा.