Shreya Maskar
तुमची साडी किंवा लेहेंगा सिंपल असेल तर एम्ब्रॉयडरी ब्लाउज निवडा. यातील भरजरी डिझाइन साडीची शोभा वाढवते. तसेच सिंपल साडीवर स्लीव्हलेस ब्लाउज शोभून दिसतो.
स्लीव्हलेस ब्लाउजवर डीप नेक गळा ही आजची ट्रेंडिंग डिझाइन आहे. तुम्ही यात खूपच शोभून दिसाल. वेस्टन लूक करायचा असेल तर हा स्लीव्हलेस ब्लाउज तुमच्याकडे असायला हवा.
प्लंजिंग नेकलाइन ब्लाउज हा 'V' आकारचा ब्लाउज असतो. तुम्ही लेहेंग्यावर हा नक्कीच ट्राय करू शकता. हा एक स्टायलिश लूक देतो.
स्लीव्हलेस ब्लाउजसाठी नेकलाइन डिझाइन्स पाहा. यात हॉल्टर नेक, व्ही-नेक, डीप नेक, हाय नेक यांचा समावेश आहे.
स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये बॅक डिझाइन्ससाठी तुम्ही डीप कट, कट-आउट्स, टाई-अप्स , सिक्विन वर्क या पॅटर्न ट्राय करा.
स्लीव्हलेस ब्लाउजला रफल्स, पर्ल एम्ब्रॉयडरी, स्पेगेटी स्ट्रॅप्स, प्रिन्सेस कट देऊन तुम्ही स्टायलिश लूक तयार करू शकता.
स्लीव्हलेस कॉलर नेकलाइन सध्या खूप ट्रेंडिंग डिझाइन्समध्ये येते. साडी, लेहेंगा यांवर तुम्ही असा स्लीव्हलेस ब्लाउज शिवू शकता. तुम्ही लाल, गोल्डन, चंदेरी, काळा या रंगाचे ब्लाउज शिवा, जे सर्व साड्यांवर उठून दिसतील.
स्लीव्हलेस ब्लाउज डिझाइन्स बोल्ड, पारंपरिक किंवा मॉडर्न लूक देऊ शकतात. मकर संक्रांतीला तुम्ही स्लीव्हलेस ब्लाउजसोबत स्पेशल लूक करा.