Manasvi Choudhary
केळी आणि खजूर ही दोन्ही पौष्टिक घटक मानले जातात. यासाठी या दोन्हीपैकी आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे ते जाणून घ्या.
केळ्यांमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी असते, तर खजुरांमध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि लोह व मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे असतात. केळ्यांच्या तुलनेत खजुरांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.
केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण यामुळे केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
केळीमध्ये फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पोट साफ राहण्यास मदत होते.
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास आणि स्नायूंमधील ताण दूर होतो.
खजुरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात.
तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल, शरीरात रक्ताची कमतरता भरून काढायची असेल आणि हाडे मजबूत करायची असतील, तर खजूर फायदेशीर आहे.
तुम्हाला जर पचनाची समस्या दूर करायची असेल ऊर्जा हवी असेल तर केळी फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.