Shreya Maskar
बनाना केक बनवण्यासाठी केळी, साखर, दही, व्हॅनिला इसेन्स, ऑलिव्ह ऑईल, गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर, मीठ, बटर, चॉकलेट चिप्स इत्यादी साहित्य लागते.
बनाना केक बनवण्यासाठी सर्वप्रथम पिकलेली केळी सोलून बारीक तुकडे करून घ्या.
बाऊलमध्ये साखर आणि केळ्याचे काप टाकून मिक्स करा.
त्यानंतर त्यात दही, ऑलिव्ह ऑईल, व्हॅनिला इसेन्स टाका.
बटर टाकून हळूहळू मिश्रण एकजीव करून घ्या.
मिश्रणात गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर आणि चिमूटभर मीठ घालून छान एकजीव करा.
सर्व मिश्रण बेकिंग मोडमध्ये काढून वरून चॉकलेट चिप्स टाका.
ओव्हनमधून 60 मिनिटे बनाना केक बेक करा.