Shruti Vilas Kadam
मैदा, तूप (किंवा बटर), दही, बेकिंग सोडा, साखर, पाणी आणि वेलची पूड घ्या.
मैद्यात तूप आणि दही घालून हलक्या हाताने मऊ पीठ तयार करा. जास्त मळू नका; 20 मिनिटे झाकून ठेवा.
पीठाचे छोटे गोळे करून मधोमध हलका दाब देऊन बालूशाहीचा पारंपरिक आकार द्या.
कढईत मंद आचेवर तेल/तूप गरम करून बालूशाही हळूहळू सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
साखर आणि पाणी उकळून एकतारी पाक तयार करा. त्यात वेलची पूड घाला.
तळलेली बालूशाही गरम असतानाच कोमट पाकात टाका आणि 5-10 मिनिटे भिजू द्या.
बालूशाही बाहेर काढून थंड झाल्यावर सर्व्ह करा; वरून बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवा.