Balushahi Recipe: दिवाळीला फराळात बनवा खुसखुशीत, पाकात मुरलेली आणि स्वादिष्ट बालुशाही, वाचा खास रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

२ कप मैदा, अर्धा कप तूप, अर्धा कप दही, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप, १ कप साखर, अर्धा कप पाणी, अर्धा चमचा वेलची पूड, बदाम आणि पिस्त्याचे काप

Balushahi Recipe | Saam Tv

मैदा चाळून घ्या

सर्वप्रथम एका भांड्यात मैदा चाळून घ्या. त्यात बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित मिसळा. मैद्यात तूप घालून हाताने चांगले मिसळा. त्यानंतर थोडे थोडे दही घालून पीठ तयार करा. पीठ जास्त घट्ट करू नका. ते हलक्या हाताने मळून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.

Balushahi Recipe | Google

बालुशाहीचा आकार द्या

तयार पिठाचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला हलक्या हाताने चपटा आकार द्या. मधोमध अंगठ्याने छोटासा खड्डा करा.

Balushahi Recipe | Google

मंद आचेवर तळून घ्या

कढईत तेल किंवा तूप गरम करा. गॅस मंद ठेवा आणि त्यात बालुशाही सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत हळूहळू तळून घ्या.

Balushahi Recipe | Saam Tv

साखरेचा पाक तयार करा

एका भांड्यात साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर विरघळल्यानंतर त्यात वेलची पूड घाला. पाकाला थोडा चिकटपणा येईपर्यंत शिजवा.

Balushahi Recipe | Saam Tv

बालुशाही पाकात बुडवा

तळलेली बालुशाही थोडी थंड झाल्यावर कोमट साखरेच्या पाकात सोडा. साधारण १० ते १५ मिनिटे पाकात ठेवा, जेणेकरून पाक बालुशाहीमध्ये छान मुरेल.

Balushahi Recipe | Saam tv

ड्रायफ्रूट्सने सजवा

बालुशाही पाकातून बाहेर काढून ताटात ठेवा. त्यावर बारीक कापलेले बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. तयार आहे खुसखुशीत आणि स्वादिष्ट बालुशाही!

Balushahi Recipe | Saam Tv

Best Salt for Daily Use: सेंधव, काळं की साधं मीठ? रोजच्या जेवणात कोणत्या मिठाचा वापर करावा? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Best Salt for Daily Use | Saam Tv
येथे क्लिक करा