Siddhi Hande
लहान मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत अन् कुरकुरीत खायचे असते. तुम्ही स्नॅक्ससाठी बाकरवडी बनवू शकतात.
बाकरवडी बनवण्यासाठी मैदा, बेसन, तेल, मीठ, लाल तिखट, ओवा, जिरं, तीळ, खोबरं, कोथिंबीर. जिरे-धना पावडर,, शेव, साखर, चिंच गुळाची चटणी आवश्यक आहे.
सर्वात आधी तुम्हाला एका परातीत मैदा, बेसनात लाल तिखट, ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे.
या मिश्रणात तेलाचं मोहन टाकून पाण्याने छान घट्ट मळून घ्या.
यानंतर जिरं, तीळ, सुके खोबरे, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. हे मिश्रण कढईत टाकून गरम करा.
यानंतर या मिश्रणात लाल तिखट, धना-जिरे पावडर, साखर आणि शेव टाकून परत वाटून घ्या.
यानंतर मळलेल्या पीठाची पारी लाटून घ्या. त्यावर चिंच-गुळाची चटणी लावा.
या पारीवर तयार केलेले सारण आणि शेव टाका. या पारीचा छान रोल बनवून घ्या. यानंतर हा रोल थोडा-थोडा कापून घ्या.
एका बाजूला कढईत तेल गरम करा. त्यात या बाकरवडी सोडून ५-७ मिनिटे तळून घ्या.
बाकरवडी लालसर झाल्यानंतर काढून घ्या. बाकरवडी थंड झाली की ती डब्ब्यात भरुन साठवून ठेवा.