Shreya Maskar
बाजरीची मऊ,लुसलुशीत भाकरी बनवण्यासाठी बाजरीचे पीठ, तीळ, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
बाजरीची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम परातीमध्ये बाजरीचे वाटीभर पीठ घ्या.
यात मीठ आणि तीळ घालून पीठ मिक्स करा.
आता हळूहळू पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या.
मळलेल्या पिठाचे मोठे गोळे करून गोलाकार भाकरी थापून घ्या.
पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यावर भाकरी टाकून वरून पाणी लावा.
भाकरी दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.
लक्षात ठेवा भाकरीचे पीठ गरम पाण्यात मळावे.