Shreya Maskar
बाजरीच्या पीठाचे लाडू बनवण्यासाठी बाजरीचे पीठ, गूळ, वेलची पावडर, काजू, बदाम तुकडे, तूप इत्यादी साहित्य लागते.
बाजरीच्या पीठाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून गरम करून घ्या.
त्यानंतर त्यात बाजरीचे पीठ टाकून ते व्यवस्थित गोल्डन फ्राय होईपर्यंत परतून घ्या. पीठ जळणार नाही याची काळजी घ्या.
भाजून घेतलेले पीठ बाजूला काढून त्याच पॅनमध्ये तूप टाकून गूळ व्यवस्थित पातळ करून घ्या.
गूळ वितळल्यानंतर त्यात भाजलेले बाजरीचे पीठ, वेलची पावडर घालून सर्व मिश्रण एकजीव करा.
यात वेलची पावडर, काजू, बदाम तुकडे टाकून मिक्स करा. तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.
मिश्रण थंड झाल्यावर हाताला तूप लावून लाडू छान वळून घ्या. हवा बंद डब्यात बाजरीचे लाडू स्टोर करा.
हिवाळ्यात रोज एक बाजरीचा लाडू खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच हाडे देखील मजबूत होतात.