Saam Tv
बैल पोळ्याला खानदेशात गोड पुरणपोळी तयार केली जाते. पुढे आपण याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
शिजवलेली चणाडाळ, गुळ, वेलचीपूड, गव्हाचे पीठ, हळद, मीठ, तेल इ.
सर्वप्रथम चणाडाळ तीन पाण्याने धुवून भिजवून तीन शिट्ट्या काढून घ्या आणि कढईमध्ये थोडीशी परतून घ्या.
पुढे डाळ पुर्णपणे कोरडी करुन घ्या.
आता मिश्रण व्यवस्थित घोटून घ्या आणि पुन्हा घट्ट शिजवून तयार करुन घ्या.
आता पोळी पात्रात पीठ घेऊन हळद, मीठ, तेल टाकून कणीक भिजवून घ्या.
आता पुरणाच्या पोळ्या लहान पोळी ही लाटून त्यावर पुर्ण पसरुन त्यावर दुसरी पोळी ठेवून पूर्ण व्यवस्थित पॅक करुन घ्या.
आता हलक्या हाताने दाबून हातावरची पुरणाची पोळी घेऊन तिला कडेकडेने ओडत मोठी करुन घ्या. मग चुलीचा वापर करुन गॅसवर मोठी कढई उलटी ठेवून खापराच्या पुरणपोळी शेकवून सर्व्ह करा.