Shruti Vilas Kadam
बदाम, साखर, तूप, दूध आणि वेलची पूड हे मुख्य साहित्य लागेल. सजावटीसाठी बदामाचे काप किंवा काजू वापरू शकता.
बदाम रात्रभर किंवा ६-८ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यांची साल काढून बदाम मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
भिजवलेले बदाम थोडे दूध घालून गुळगुळीत वाटून घ्या. पेस्ट खूप पातळ करू नका, यामुळे हलव्याला योग्य पोत मिळतो.
कढईत तूप गरम करून त्यात बदामाची पेस्ट घाला. मंद आचेवर सतत ढवळत बदाम चांगले परतून घ्या.
बदामाचा कच्चा वास कमी झाल्यावर त्यात साखर आणि आवश्यकतेनुसार दूध घाला. मिश्रण सतत ढवळत राहा, जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही.
हलवा घट्ट होऊ लागला आणि कढईच्या कडा सोडू लागला की त्यात वेलची पूड घाला. आणखी थोडे तूप घालून हलवा चांगला शिजवा.
हलवा तयार झाल्यानंतर त्यावर बदाम-काजूचे काप घालून सजवा. हा बदामी हलवा गरम किंवा कोमट सर्व्ह केल्यास अधिक स्वादिष्ट लागतो.