ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काहींना तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का तोंडातून दुर्गंधी येणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे, जाणू न घ्या.
श्वास घेताना तोंडातून दुर्गंधी येणे हे हार्ट फेल होण्याचे लक्षण आहे. अशावेळी, श्वासामध्ये अॅसिटोन आणि पेन्टेन नावाचे केमिकल मार्कसचे प्रमाण वाढते.
जर तुमच्या श्वासातून नेल पेंट सारखा वास येत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. हे डायबिटीक किटोएसिडोसिसचे लक्षण असू शकते.
किडनी आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. जर तोंडातून माशांचा वास येत असेल तर हे किडनी खराब झाल्याचे लक्षण असू शकते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा झोपेशी संबंधित समस्या येऊ शकतात. झोप पूर्ण न झाल्यास सकाळी तीव्र आणि सतत श्वासातून दुर्गंधी येऊ शकते.
हिरड्यांना सूज आल्यामुळे देखील तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सर्दी, ऍलर्जी किंवा सायनसची समस्या असेल तर तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.