Manasvi Choudhary
हॅलिटोसिस ही तोंडाची एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये श्वासाला सतत तीव्र दुर्गंधी येते. सामान्य तोंडाच्या दुर्गंधीपेक्षा ही दुर्गंधी दीर्घकाळ टिकणारी असते.
हॅलिटोसिस कारणे अनेक आहेत. दातांच्या या समस्यांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार करणे गरजेचे आहे, कारण हे हिरड्यांच्या किंवा दातांच्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. हॅलिटोसिस होण्याची मुख्य कारणे काय आहेत? ती या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
जर तुम्ही नियमित आणि योग्य प्रकारे ब्रश करत नसाल, तर अन्नाचे कण दातांमध्ये अडकून राहतात. यामुळे तोंडात जिवाणू वाढतात आणि दुर्गंधी येऊ शकते.
तोंडातून जिवाणू आणि अन्नाचे बारीक कण याची प्रोसेस करण्यासाठी 'लाळ' (Saliva) महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, लाळेची निर्मिती न झाल्याने तोंड कोरडे पडल्यास जिवाणूंची संख्या वाढते आणि श्वासाला दुर्गंधी येते.
सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने थेट तोंडाला दुर्गंधी येते आणि तोंड कोरडे पडण्याची समस्या वाढते.
१) दिवसातून दोन वेळा दात घासणे महत्वाचे आहे.
२) जीभ पूर्णपणे स्वच्छ करा. कारण तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत असलेले जिवाणून जीभेवर असू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या .