Manasvi Choudhary
बॅकलेस ब्लाऊज हा स्टायलिश आणि मॉडर्न लूकचा प्रकार आहे. साडी किंवा लेहेंग्यावर ही स्टाईल उठून दिसते.
बॅकलेस ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये अनेक ट्रेडिंग पॅटर्न्स आहेत जे तुम्ही साडीवर निवडू शकता.
ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला 'डोरी' आणि 'लटकन' स्टाईल करतात सध्या ब्लाऊजचा हा पॅटर्न ट्रेडिंगमध्ये आहे.
पाठीच्या गळ्याला व्ही शेप मध्ये डिझाईन करून बॅकलेस स्टाईल केली जाते अत्यंत युनिक हा ब्लाऊज पॅटर्न आहे.
पाठीवर फक्त एकच नाजूक पट्टी असते किंवा तिथे एक मोठा 'बो' बांधायचा ही स्टाईल देखील तुम्ही निवडू शकता.
जर तुम्हाला बॅकलेस घालायची इच्छा असेल पण कम्फर्टेबल वाटत नसेल, तर पाठीला 'स्किन कलर'ची नेट लावा.
पाठीवर त्रिकोणी किंवा हिऱ्याच्या आकाराचे मोठे 'कट-आऊट' असते. हे सध्या डिझायनर ब्लाऊजमध्ये खूप चर्चेत आहे.