Manasvi Choudhary
चेहऱ्याची काळजी आपण सर्वजण घेतो मात्र अनेकदा पाठीवर पिंपल्स, पुरळ येण्याच्या समस्या उद्भवतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही .
पाठीवरचे पिंपल्स घालवण्यासाठी तुम्ही सोपे उपाय करू शकता. नेमकं काय करायचे? हे आज आपण पाहूया.
कदा शाम्पू आणि कंडिशनमधील रसायने पाठीवर राहिल्यामुळे छिद्रे बंद होतात.केस धुतल्यानंतर ते वरती बांधा आणि मगच पाठ 'बॉडी वॉश'ने स्वच्छ करा. यामुळे केसांच्या उत्पादन पाठीवर राहणार नाहीत.
घाम आणि ओलावा यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात, वर्कआउट संपल्यानंतर १० मिनिटांच्या आत अंघोळ करा. शक्य नसल्यास किमान कपडे बदला आणि पाठ कोरडी करा.
सिंथेटिक किंवा घट्ट कपड्यांमुळे त्वचेला हवा मिळत नाही आणि घर्षणामुळे पिंपल्स वाढतात. सुती कपडे घाम शोषून घेतात आणि त्वचेला श्वास घेऊ देतात.
साध्या साबणाऐवजी 'सॅलिसिलिक ॲसिड' वापरा हा बॉडी वॉश लावल्यावर १-२ मिनिटे तसाच राहू द्या आणि मग धुवा.
तुमच्या बेडशीटवर साचलेली धूळ आणि मृत त्वचा पुन्हा पाठीला लागून पिंपल्स येऊ शकतात. आठवड्यातून किमान एकदा बेडशीट बदला आणि नेहमी स्वच्छ, सुकलेला टॉवेल वापरा.