Mango Seeds: आंब्याच्या कोयीचे आयुर्वेदिक उपयोग, तुमच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते?

Dhanshri Shintre

पचनक्रिया सुधारते

आंब्याची कोय फायबरयुक्त असते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते

यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

हृदयासाठी फायदेशीर

कोयीत असलेले पोषक तत्त्व हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असून हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

इम्युनिटी वाढवते

आंब्याच्या कोयीमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

किडनीसाठी लाभदायक

आंब्याच्या कोयीपासून तयार केलेले पाणी किडनी स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि किडनी स्टोनसाठी फायदेशीर मानले जाते.

डायबेटीज नियंत्रणासाठी उपयुक्त

कोयीत असलेल्या काही घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, जे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

दातांच्या आरोग्यासाठी चांगले

कोयीचा पावडर करून दातांवर लावल्यास दातदुखी, हिरड्यांची सूज आणि दुर्गंधीवर फायदा होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

कोयीपासून तयार केलेला लेप त्वचेवर लावल्यास डाग, पिंपल्स कमी होतात आणि त्वचा मृदू व चमकदार होते.

NEXT: कचरा समजून फेकाल? खजूराच्या बियांपासून बनवा आरोग्यदायी उपाय, जाणून घ्या कसे

येथे क्लिक करा