Shreya Maskar
पावसाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक काढा प्या. म्हणजे सर्दी-खोकला होणार नाही.
आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी पाणी, आलं, दालचिनी पावडर, हळद, काळी मिरी पावडर, मध आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.
आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी भांड्यात पाणी उकळायला ठेवा.
पाण्याला उकळी आल्यावर त्यात आले, दालचिनी, हळद आणि काळी मिरी पावडर टाका.
५-१० मिनिटे काढा मंद आचेवर उकळू घ्या.
त्यानंतर गॅस बंद करून त्यात मध आणि लिंबू घालून मिक्स करा.
पावसाळ्यात सर्दी, खोकल्याचा त्रास होत असेल तर रोज १ छोटा ग्लास हा आयुर्वेदिक काढा प्या.
काढा अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही यात तुळस, वेलची, लवंग, सुंठ देखील टाकू शकता.