Shreya Maskar
आल्याचा काढा बनवण्यासाठी लवंग, काळी मिरी, हळद, आले, मध आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
आल्याचा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम लवंग, काळी मिरी, हळद, आले मिक्सरला वाटून घ्या.
पॅनमध्ये थोडे तूप टाकून मिक्सरला वाटलेले मिश्रण छान भाजून घ्या.
यात गरजेनुसार पाणी टाकून एक उकळी काढून घ्या.
आता तयार काढ्यामध्ये मध टाकून मिक्स करा.
मिश्रण एकजीव झाल्यावर गरमागरम आल्याच्या काढा प्या.
आल्याचा काढा प्यायल्याने घशाचे विकार कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आल्याचा काढा वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे.