Shreya Maskar
पावसाळ्यात अनेक वेळा रात्रीची थंडी वाजते. त्यामुळे रात्री लोक मोकळ्या पायाला थंडी वाजू नये म्हणून मोजे घालून झोपतात.
रात्री मोजे घातल्याने अनेकांना शांत झोप लागते.
पण सॉक्सचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
संशोधनानुसार, रात्री पायात मोजे घालून झोपल्याने जास्त झोप लागते.
रात्रभर सॉक्स घातल्याने शरीराचे तापमान कमी होते.
सॉक्स घालताना जर ते पायाला घट्ट बसत असतील तर, शरीराला समस्या उद्भवू शकतात.
घट्ट सॉक्स घातल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होऊन अडथळे येतात.
घट्ट सॉक्समुळे पायांमध्ये हवा जात नाही त्यामुळे पाय गरम होतात.
घट्ट सॉक्समुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
हे इन्फेक्शन कधीकधी नखांमध्ये पसरते. यामुळे नख पिवळी पडून तुटू लागतात. नखांना सूज येऊन वेदना होतात.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.