ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वांनाच निरोगी आणि हायड्रेटेड त्वचा पाहिजेल असते. निरोगी चेहऱ्यासाठी त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं.
चेहऱ्यावर काही चुकीच्या वस्तू लावल्यामुळे चेहरा खराब होऊ शकतो.
चेहरा धुण्यासाठी चुकूनही साबणाचा वापर करू नये यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.
चेहऱ्यावर चुकूनही तुथपेस्ट लावू नका यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सच्या समस्या उद्भवू शकतात.
चेहऱ्याची त्वचा सेंसिटिव असते त्यामुळे त्यावर बॉडी लोशनचा वापर करु नये.
चेहरा धुण्यासाठी नेहमी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करावा. गरम पाणी वापरल्यास रॅशेसच्या समस्या उद्भवतात.
त्वचेची काळजी घेतल्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.