Avoid Using Kokum: कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाकू नये?

Surabhi Jayashree Jagdish

कोकम

कोकम हे आंबट चवीसाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. विशेषतः कोकण याचा वापर होतो. पण प्रत्येक भाजीसोबत कोकम वापरणं योग्य नसतं. कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाळावं हे पाहूयात.

कडू चवीच्या भाज्या

कडू चवीच्या भाज्यांमध्ये कोकम घातल्यास चवीत संतुलन राहत नाही. कारल्यासारख्या भाज्यांची नैसर्गिक कडवट चव आणि कोकमची आंबट चव एकत्र येऊन पदार्थ विचित्र लागतो.

पनीर, मलई करी

पनीर असलेल्या भाज्यांमध्ये कोकम घातल्यास भाजी खराब शक्यता असते. कोकममध्ये असलेली आंबटता दुधाशी प्रतिक्रिया देते आणि टेक्स्चर खराब करतं.

गोडसर भाज्या

गोड चवीच्या भाज्यांमध्ये कोकम घातल्यास चव बिघडू शकते. गोड आणि आंबट यांचे संतुलन नीट साधलं नाही तर पदार्थ विचित्र चवीचा बनतो.

पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये आधीच थोडीशी कडवट किंवा तिखटसर चव असते. त्यात कोकम घातल्यास चवीत गोंधळ निर्माण होतो आणि मूळ चव हरवते. त्यामुळे पालक किंवा मेथीसारख्या भाज्यांमध्ये कोकम टाळावा.

आधीच आंबट असलेले पदार्थ

टोमॅटो किंवा चिंच वापरलेल्या पदार्थांमध्ये कोकम घातल्यास आंबटपणा जास्त होतो. त्यामुळे पदार्थ खूपच आंबट होऊन खाण्यास अवघड वाटू शकतो. अशा वेळी एकाच आंबट घटकावर भर देणे योग्य ठरते.

कोरड्या भाज्या

कोकम साधारणपणे रस्सा किंवा आमटीसारख्या पदार्थांसाठी वापरले जाते. कोरड्या भाज्यांमध्ये ते नीट मिसळत नाही आणि चव वेगळी वाटते. त्यामुळे ड्राय भाजी करताना कोकम वापरणे टाळावे.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वयंपाकात कोणते मसाले वापरले जायचे?

Maratha empire food culture
येथे क्लिक करा