Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Surabhi Jayashree Jagdish

बाईकने फिरणं

अनेक लोक आपल्या कुटुंबासोबत बाइक किंवा स्कूटीने फिरायला जाताना रस्त्यावर बाहेर पडतात. पण अशा वेळी सुरक्षिततेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. जे खूप धोकादायक ठरू शकतं आणि अपघाताचा धोका वाढतो.

Bike safety tips

अपघात

रस्त्यावर प्रवास करताना अनेक वेळा अचानक आणि अनपेक्षित अपघात घडतात. ज्यामुळे गंभीर इजा किंवा जीवितहानी होण्याचा मोठा धोका निर्माण होतो आणि परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते.

Road accident prevention

वाहतुकीचे नियम

जर आपण वाहतुकीचे नियम नीट पाळले आणि थोडीही काळजी घेतली. तर अशा अपघातांमध्ये आपला जीव वाचवण्याची शक्यता खूप वाढते आणि सुरक्षित प्रवास शक्य होतो.

Two wheeler safety

हेल्मेट

फिरायला निघण्यापूर्वी हेल्मेट घालणं ही सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची सुरक्षिततेची पायरी आहे. जी प्रत्येक स्कुटी किंवा बाईक चालकाने काटेकोरपणे पाळली पाहिजे आणि दुर्लक्ष करू नये.

Traffic rules riding

हल्मेटचा दर्जा

अनेक लोक फक्त पोलिसांच्या दंडाच्या भीतीमुळे स्वस्त आणि कमी दर्जाचे हेल्मेट खरेदी करतात. पण अशी निवड त्यांच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

ISI mark helmet

काय तपासलं पाहिजे

हेल्मेट खरेदी करताना त्याची क्वालिटी, सुरक्षितता आणि ISI मार्किंग आहे की नाही हे नीट तपासणं खूप गरजेचं आहे. कारण यावरच अपघाताच्या वेळी मिळणारे संरक्षण अवलंबून असते.

Scooter safety rules

लॉकिंग सिस्टम

तसंच हेल्मेटचं लॉकिंग सिस्टम किती मजबूत आहे आणि तो किती प्रमाणात आघात सहन करू शकतो याची सविस्तर माहिती घेऊनच योग्य आणि सुरक्षित हेल्मेट निवडणं आवश्यक आहे.

Accident risk prevention

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Heart health tips
येथे क्लिक करा