Dhanshri Shintre
प्रवासादरम्यान मुलींनी पोशाख निवडताना काळजी घ्यावी, कारण योग्य कपड्यांनी सुरक्षित आणि आरामदायी अनुभव मिळतो.
प्रवास करताना मुलींनी हवामान, ठिकाण आणि सुरक्षिततेचा विचार करून कपड्यांची निवड काळजीपूर्वक करावी.
काही देशांमध्ये घट्ट कपड्यांना विरोध असतो, त्यामुळे प्रवासापूर्वी स्थानिक कपड्यांचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
धार्मिक स्थळी भेट देताना आदर म्हणून शरीर झाकणारे, सभ्य कपडे परिधान करणे आवश्यक असते. नियम पाळा.
पारदर्शक आणि नेटच्या कपड्यांमुळे प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू शकते, त्यामुळे आरामदायक कपड्यांची निवड करावी.
प्रिंटेट संदेश असलेले टी-शर्ट गैरसमज निर्माण करू शकतात, त्यामुळे अशा प्रिंट्सच्या कपड्यांपासून प्रवासात दूर राहा.
प्रवासात खूप चमकदार कपडे लक्ष वेधू शकतात आणि अस्वस्थता निर्माण करू शकतात, त्यामुळे साधे कपडेच निवडा.
अत्यंत बॅगी किंवा फार मोठे कपडे घालणे टाळा, कारण ते प्रवासात गैरसोय आणि असुविधा निर्माण करू शकतात.