पावसाळ्यात मुलांना दूध देताय? ७ चुका पडू शकतात महागात

Omkar Sonawane

पावसाळ्यात दुधाबाबत 'या' 8 चुका टाळा!

दूध योग्य प्रकारे उकळून घ्या, पावसाळ्यात हवामानातील बदलांमुळे विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळे दूध वापरण्यापूर्वी ते नेहमी चांगल्या प्रकारे उकळून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

kids milk health tips | saam tv

फ्रिजमधून काढताच देऊ नका

फ्रिजमधील थंड दूध लगेच मुलांना पाजणे टाळा. दूध थोडा वेळ बाहेर ठेऊन सामान्य होऊ ड्या किंवा हलके कोमट करूनच प्यायला द्या.

rainy season diet kids | saam tv

जास्त वेळे बाहेर ठेवलेले दूध टाळा

पावसाळ्यात हवामानामुळे दूध लवकर खराब होते. त्यामुळे उकळलेले दूध जास्त वेळ बाहेर उघडे न ठेवता योग्य वेळी फ्रिजमध्ये ठेवा.

milk storage tips | saam tv

दुधाचा वास किंवा चव बदलल्यास वापरू नका

दुधाला वेगळा वास येत असेल, चव बदलली असेल किंवा दूध फाटले असेल, तर ते अजिबात वापरू नका, अशा दुधामुळे विषबाधा होऊ शकते.

children digestion care | saam tv

आंबट पदार्थासोबत दूध पिणे टाळा

दूध पिण्याच्या आधी किंवा नंतर लगेचच आंबट पदार्थ खाणे टाळा. यामुळे पचनक्रिया बिघडून पोटात गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.

baby feeding mistakes | saam tv

दुधाची बाटली नियमित स्वच्छ करा

लहान मुल बाटलीने दूध पीत असेल, तर प्रत्येक वापरानंतर बाटली आणि निप्पल गरम पाण्याने स्वच्छ धुवावे.

monsoon food safety | saam tv

मुलांना प्रमाणापेक्षा जास्त दूध देऊ नका

पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जास्त दूध पाजण्याचा हट्ट न करता मुलांच्या वयानुसार आणि गरजेनुसारच दूध द्या

kids immunity monsoon | saam tv

ताजे दूध पिण्याला प्राधान्य द्या

लहान मुलांची पचनशक्ती ही नाजुक असते त्यामुळे नेहमी ताजे दूध द्या, जेणेकरून पोटदुखी आणि उलट्यांसारख्या समस्या टाळता येतील.

avoid sour food milk | saam tv

Fancy Suit Designs: रक्षाबंधनाला काय घालावं सुचत नाहीये? ट्राय करा हे 5 ट्रेन्डी फॅन्सी सूट डिझाईन्स

Fancy Suit Designs | saam tv
येथे क्लिक करा