Dhanshri Shintre
रिकाम्या पोटी शरीराची पीएच पातळी असंतुलित आणि आम्लता वाढलेली असते, त्यामुळे काही पदार्थ खाल्ल्याने अपचन, गॅस व जळजळ होऊ शकते.
लिंबूवर्गीय फळांतील सायट्रिक अॅसिड रिकाम्या पोटी घेतल्यास अॅसिडिटी वाढू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ, गॅस व पोटदुखी होऊ शकते.
दही आरोग्यासाठी चांगले असले तरी रिकाम्या पोटी त्यातील लॅक्टिक अॅसिड गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये मिसळल्याने पाचनतंत्र बिघडू शकते.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने मॅग्नेशियमचे प्रमाण अचानक वाढू शकते, ज्यामुळे हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते.
रिकाम्या पोटी मसालेदार व तेलकट अन्न घेतल्यास पचनावर ताण येतो, ज्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ, गॅस, उलट्या किंवा पोटात पेटके होऊ शकतात.
सकाळी उठताच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय अपायकारक ठरू शकते, कारण त्यातील कॅफिन आम्लता वाढवून पोटाच्या आरोग्यावर परिणाम करते.
रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम, कोमट पाणी, ओट्स, दलिया, काजू, पपई आणि सफरचंद खाणं फायदेशीर ठरते.