Manasvi Choudhary
मनामध्ये विविध प्रकारचे विचार येत असतात ज्यामुळे नैराश्याची भावना निर्माण होते.
तुमच्याही मनात नकारात्मक विचार येत असतील तर मन शांत करण्यासाठी खालील पध्दती अवलबंवा.
तुमच्या मनात जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येऊ लागतात तेव्हा तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा.
व्यायाम केल्याने शरीरातून असे हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. मनातील नैराश्याची भावना त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.
नकारात्मक विचारांपासून दुसरीकडे वळवण्यासाठी व्यस्त राहणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुमच्या आवडत्या गोष्टी करा. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा.
दररोज सकाळी उठल्यानंतर ध्यान आणि प्राणायाम करणे आवश्यक आहे. असे केल्याने मन शांत राहते.
जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर डायरी लिहा. समस्येचे कारण लिहून ठेवल्याने मन हलके होते. अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी ही पध्दत महत्वाची ठरेल.